जळगाव : प्रतिनिधी । शहरातील सर्व खाजगी रुग्णालयांमध्ये अॅन्टिजेंन चाचणीची व्यवस्था असावी आणि त्यासाठी सक्ती करावी अशी मागणी एन एस यु आयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे
आज जळगाव जिल्हा एनएसयुआयच्या वतीने जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे ई-मेल द्वारे दोन मागण्या केल्या आहेत
सध्या जळगाव जिल्हा व शहरामध्ये कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढत आहे. कोरोनाची सामान्य लक्षणे बहुतांश जनतेमध्ये आढळून येत आहे . परंतु शहरातील बिकट अवस्थेला बघून शहरातील जनता धास्तावलेली आहे.
शहरातील सामान्य रुग्णालयांमध्ये बेड मिळत नाही, खाजगी रुग्णांलयातील अव्वाच्या सव्वा सुरु असलेली रुग्णांची लूट बघून सामान्य गरीब घरातील नागरिक, तरुण व महिला कोरोनाची प्राथमिक लक्षणे आढळल्यानंतरदेखील कोविड रुग्णालयाऐवजी जनरल प्रॅक्टिशनर (सामान्य चिकित्सक) डॉक्टरांकडे गर्दी करू लागल्या आहेत. रुग्ण शहरातील जनरल प्रॅक्टिशनर डॉक्टरांकडून तात्पुरत्या स्वरूपातील उपचार घेऊन शहरांमध्ये वावरत आहे. अशा रुग्णांच्या संपर्कामध्ये शहरातील किंवा रुग्णांच्या कुटुंबातील इतरही काही लोक आल्यास त्यांना कोरोनाची लागण होण्याची दाट शक्यता आहे.
जिल्हा एनएसयूआय जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली की, “शहरातील सर्व जनरल प्रॅक्टिशनर डॉक्टरांच्या रुग्णालयांमध्ये तेथे आलेल्या सर्व रुग्णांना कोरोनाची अॅन्टिजेंन चाचणी बंधनकारक करावी, जनरल प्रॅक्टिशनर डॉक्टरांकडे आलेल्या रुग्णांमधून चाचणी ज्यांची पॉझिटिव आली त्या रुग्णांवर कोरोनाचे उपचार त्वरित सुरू करता येतील त्या रुग्णापासून इतरही निरोगी लोकांना किंवा त्याच्या कुटुंबीयांना कोरोनाचा धोका होणार नाही शहरात वाढता प्रादुर्भाव कमी करता येईल हे रुग्ण कोरोनाचे प्राथमिक लक्षण असल्यानंतरदेखील केवळ खाजगी रुग्णालयं परवडत नाही व सामान्य रुग्णालयांमध्ये जागा नाही या हेतूपोटी जनरल प्रॅक्टिशनर डॉक्टरांकडून तात्पुरते उपचार घेऊन शहरामध्ये वावरत आहे हे नक्कीच घातक ठरणार आहे.
सर्वत्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता सामान्य रुग्णालय अपुरे पडत असताना जिल्हा प्रशासनाने शहरातील खाजगी रुग्णालयांना कोविंड डेडिकेटेड रुग्णालय म्हणून परवानगी दिली.ही खाजगी रुग्णालये शहरात सामान्य निवासी भागांमध्ये उभारलेली आहे या खासगी रुग्णालयाच्या व डेडिकेटेड कोविंड रुग्णालयांच्या अवतीभोवती सामान्य जनतेचा रहिवास आहे. या रुग्णालयांमध्ये कोरोनाचा रुग्ण ऍडमिट असतो परंतु रुग्णालयाच्या बाहेर व इतर रहिवासी असलेल्या गल्ल्यांमध्ये कोवीड रुग्णाचे नातेवाईक गर्दी करत आहे. त्यामुळे या खासगी रुग्णालयाच्या अवतीभवती असलेले रहिवासी धास्तावले आहेत भीतीपोटी घराच्या ओट्यावरसुध्दा निघू शकत नाही.
कोविड रुग्णांच्या नातेवाईकांमुळे सामान्य जनता रहिवासी असलेल्या भागांमध्ये कोरोनाचे संक्रमण झपाट्याने होऊ शकते खाजगी रुग्णालय असलेल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये रुग्णाच्या नातेवाईकांमुळे कोरोनाचे संक्रमण होऊ शकते. हेदेखील गंभीर आहे.
त्यामुळे शहरातील सर्व खासगी रुग्णालयांच्या आजूबाजूच्या गल्लीमध्ये सर्वत्र जिल्हा प्रशासनाने किंवा त्या खाजगी कोविड रुग्णालयाने सॅनिटायझेशन करावे जेणेकरून रुग्णालयाच्या अवतीभोवती रहिवासी असलेला सामान्य नागरिक कोरोनापासून वाचेलकोविड रुग्णालयांच्या बाहेरील परिसरात केलेल्या सॅनिटायझेशनाचा अहवाल नागरिकांच्या माहितीस्तव जाहीर केला जावा अशीही मागणी मराठे यांनी केली आहे