सातारा प्रतिनिधी | संजय राऊत तर उद्धव ठाकरेंना पंतप्रधान करायला निघालेत तर कधी शरद पवार पंतप्रधान होतील अशा गर्जना करत आहेत. शरद पवार तर नेहमीच पंतप्रधान होत असतात, अशा शब्दांमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीकास्त्र सोडले आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सातारा जिल्ह्यातील फलटण येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. ज्यांनी आमच्या जीवावर अठरा खासदार निवडून आणलेत ते आता देशाच्या राजकारणात जायची स्वप्न बघत आहेत. देशाच्या राजकारणात जायचं असेल तर त्यासाठी घराच्या बाहेर पडावं लागतं. गेल्या दोन वर्षात एकदाही मंत्रालयात न गेलेल्यांनी वेगवेगळ्या वल्गणा करु नयेत अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.
दरम्यान, याप्रसंगी त्यांनी संजय राऊत आणि शरद पवार यांनाही लक्ष्य केले. संजय राऊत तर उद्धव ठाकरेंना पंतप्रधान करायला निघालेत तर कधी शरद पवार पंतप्रधान होतील अशा गर्जना करत आहेत. शरद पवार तर नेहमीच पंतप्रधान होत असतात, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी मारला. तसेच संजय राऊत हे एक नंबरचे डबल ढोलकी असल्याचा आरोप चंद्रकांत पाटलांनी केलाय. शिवसेना खासदार संजय राऊत हे एक नंबरची डबल ढोलकी आहेत. ममता बनर्जी मुंबईमध्ये आल्या की त्यांच्या सुरात सुर मिसळतात. दिल्लीत गेले की राहुल गांधी यांच्या सुरात सुर मिसळतात, अशी टीका पाटील यांनी केलीय.