Home धर्म-समाज यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी अमोल भिरूड

यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी अमोल भिरूड


यावल प्रतिनिधी । शहरातील शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात चेअरमनपदाची निवड पार पडली. यात अमोल सुर्यकांत भिरूड यांची बिनविरोधत निवड करण्यात आली.

चेअरमनपदाच्या जागेकरीता अमोल भिरूड यांनी सर्वानुमते उमेदवारी करावी असा आग्रह करीत त्यांचा अर्ज दाखल करण्यात आला होत. सुचक म्हणून माजी चेअरमन प्रभाकर सोनवणे तर अनुमोदन विनोद पाटील यांनी दिले होते. निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निबंधक एस.एन. गायकवाड यांनी काम पाहिले. एकमेव अर्ज आल्याने अमोल भिरूड यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

या निवड प्रसंगी पंचायत समितीचे गट नेते शेखर पाटील, संघाचे संचालक नरेंद्र नारखेडे, गणेश नेहते, मुन्ना पाटील, उमेश फेगडे, नितीन नेमाडे,  प्रशांत चौधरी, यशवंत तळेले, नितीन चौधरी, सुनिल नेवे,  तेजस पाटील, आर.जी. नाना पाटील, चंद्रशेखर चौधरी, सुनील फिरके भारती चौधरी, नीलिमा किरंगे,  केतन किरंगे, कबीर खान, अनिल जंजाळे, विवेक देवरे, हेमंत येवले, प्रा. मुकेश येवले, सुनील फेगडे, पराग धनुरे, पंकज वाळके, योगेश लावणे, संदीप धानोरे, विकी गजरे, ज्ञानेश्वर वारूळकर आदींची उपस्थिती होती. या निवडणुकीकरिता संघाचे व्यवस्थापक सूर्यकांत गाजरे, सुरेश यावलकर, संजय भोईटे, मयूर बोरले, रामचंद्र भोईटे आदींनी परिश्रम घेतले.

 


Protected Content

Play sound