शबाना आझमी यांच्या कारचालकावर गुन्हा दाखल

IMG 20200118 WA0070

रायगड, वृत्तसंस्था | मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर शनिवारी खालापूर टोलनाक्याजवळ ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांच्या गाडीला अपघात झाला. या प्रकरणी ट्रक चालकाने खालापूर येथे कारचालक अमलेश कामतविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार रायगड पोलिसांनी कारचालकाविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

 

एका ट्रकला शबाना आझमी यांची कार मागून धडकली आणि हा अपघात घडला. ‘शबाना आझमी यांचा कारचालक वेगाने गाडी चालवत होता. त्यामुळे त्याच्या गाडीची ट्रकला धडक बसली. यामध्ये त्याचा बेजबाबदारपणा होता’, असे ट्रक चालकाचे म्हणणे आहे. त्यानुसार कलम २७९ आणि ३३७ आणि मोटार वाहन अधिनियम कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शबाना आझमी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरुन प्रवास करत असताना खालापूर टोलनाक्याजवळ त्यांच्या गाडीला अपघात झाला. यामध्ये त्या आणि कारचालक जखमी झाले. त्यांच्यावर कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शबाना आझमी यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

Protected Content