शपथविधीच्या आधीच लागली ‘फिल्डींग’ ! : राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी अजित पवार

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याआधीच निवडणूक आयोगाला ४० आमदाराच्या स्वाक्षरीचे पत्र पाठवून आपली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे सूचित केले होते अशी माहिती आता समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

 

आजचा दिवस राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षासाठी अतिशय महत्वाचा असा आहे. पक्षाची काका आणि पुतण्या अशा दोन गटांमध्ये उभी फूट पडली असून दोन्ही गटांतर्फे आपणच खरा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष असल्याचा दावा करण्यात येत आहे. आधीच या संदर्भात जयंत पाटील यांनी ९ आमदारांच्या अपात्रतेसाठी अर्ज दाखल केला आहे. यावर सुनावणी होण्याआधीच एक मोठी अपडेट समोर आली आहे.

 

अजित पवार यांनी आपल्या सहकार्‍यांसह राज्य मंत्रीमंडळात सहभागी होण्याआधी दोन दिवस अर्थात ३० जून रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवून पक्षाच्या अध्यक्षपदी आपली निवड झाल्याचे नमूद केले आहे. याच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या ४० आमदारांच्या स्वाक्षर्‍या असलेले पत्र देखील जोडण्यात आलेले आहे. यामुळे शिवसेनेतील फुटीपासून धडा घेत अजित पवार आणि त्यांच्या सहकार्‍यांनी फुटीच्या आधीच कागदोपत्री तजवीज केल्याचे मानले जात आहे. या प्रकरणी शरद पवार यांच्या गटातर्फे अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

Protected Content