शनिवारी नव्हे इतर दिवशी सुट्टी हवी; कर्मचार्‍यांची मागणी

suti

मुंबई प्रतिनिधी । सरकारने पाच दिवसांचा आठवडा केला असला तरी यात रविवारची सुट्टी कायम ठेवून शनिवार ऐवजी आठवड्यातील अन्य दिवस सुट्टी द्यावी अशी मागणी आता राज्य शासकीय औद्योगिक व औद्योगिकेतर कर्मचारी कामगार संघाने केली आहे.

याबाबत वृत्त असे की, राज्य सरकारच्या कर्मचार्‍यांसाठी नुकताच पाच दिवसांचा आठवडा करण्यात आल्याचे निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासकीय औद्योगिक व औद्योगिकेतर कर्मचारी कामगार संघाने याला विरोध करून शनिवार, रविवार सुट्टीऐवजी रविवारची सुट्टी कायम ठेवत आठवड्यातील इतर दिवशी दुसरी सुट्टी देण्याची मागणी केली आहे. याबाबत संघाचे अध्यक्ष अ.द. कुलकर्णी यांनी सांगितले की, शनिवार व रविवारी सर्वच कर्मचार्‍यांना एकत्रित सुट्टी दिल्याने सलग दोन दिवस शासकीय कार्यालये ठप्प पडतील. परिणामी, सोमवारी कर्मचार्‍यांवर कामाचा अधिक भार असेल. त्याऐवजी कार्यालयातील कर्मचार्यांना रविवारची सार्वजनिक सुट्टी कायम ठेवावी. तसेच एकाच विभागातील कर्मचार्‍यांमध्ये सोमवार ते शुक्रवारदरम्यान सुट्टीचे वाटप करावे. जेणेकरून शनिवारी अर्ध्या दिवसाची सुट्टी असलेल्या नागरिकांना शासकीय कामासाठी सोमवार ते शुक्रवारदरम्यान स्वतंत्र सुट्टी घेण्याची गरज भासणार नाही. या संदर्भात आपण लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत अशी माहितीदेखील त्यांनी दिली.

Protected Content