व्याज दर कपातीसारखीच इंधन दरवाढही मागे घ्या — सुप्रिया सुळे

 

मुंबई : वृत्तसंस्था । अल्पबचत  व्याजदर  कपात करण्याचा निर्णय सरकारनं तातडीनं फिरविला. सरकारचं अभिनंदन जनतेला दिलासा मिळाला. आता केंद्र सरकारनं अशीच तत्परता पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाचा गॅस यांवची  दरवाढ देखील तात्काळ मागे घ्यावी ही विनंती,” असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

 

अल्पबचत योजनांवरील व्याजदराच्या निर्णयावर घुमजाव केल्यानंतर मोदी सरकारला टीकेचा सामना करावा लागत आहे. विरोधकांकडून सरकारच्या यू-टर्न भूमिकेवर आणि झालेल्या चुकीवरही निशाणा साधला जात असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही मोदी सरकारला यू-टर्न भूमिकेवरून चिमटा काढला आहे. तसंच अभिनंदनही केलं आहे.

 

सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधीवरील अर्थात पीपीएफसह अल्पबचत योजनांवरील व्याजदरात कपात करण्याचा आदेश अर्थ मंत्रालयाने बुधवारी काढला होता. हा निर्णय काही तासांतच सरकारने मागे घेतला.  अल्पबचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना धक्का बसला. त्यावरून टीका होण्यास सुरू झाल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सकाळीच खुलासा करत सावरासारव केली. हा आदेश चुकीनं काढला गेला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

Protected Content