तेजस्वी यादवसुद्धा खवळले

 

पाटणा : वृत्तसंस्था । राष्ट्रीय जनता दलचे नेते आणि बिहारचे विरोधी पक्ष नेते तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोग हवाय कशाला अशी उपरोधिक भूमिका घेतलीय. निवडणूक आयोगाऐवजी सर्व कारभार थेट भाजपाच्या हाती द्यावा असा उपरोधिक टोला त्यांनी लगावलाय आहे.

 

आसाममध्ये एका भाजपा उमेदवाराच्या गाडीमध्येच ईव्हीएम सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. राज्यामध्ये सुरु असणाऱ्या विधानसभा निवडणुकींचा दुसरा टप्पा गुरुवारी पार पडला. गुरुवारी आसाममधील ३९ जागांसाठी मतदान झालं. मात्र कालच निवडणुसाठी मतदान संपल्यानंतर रात्री एका ठिकाणी चक्क भाजपा उमेदवाराच्या गाडीमध्येच मतदानासाठी वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएम सापडल्या. यासंदर्भात सर्वच विरोधी पक्षांनी भाजपावर निशाणा साधला आहे. निवडणूक आयोगाने याबद्दल स्पष्टीकरणही दिलं आहे.

 

तेजस्वी यादव यांनी निवडणुक आयोगासाठी वापरल्या जाणाऱ्या ईसीआयचा शॉर्टफॉर्म आपल्या ट्विटमध्ये विश्वार्हता संपत चालेलं आयोग असा केला आहे. अशाप्रकारे पडद्यामागून काम करण्यापेक्षा थेट निवडणूक आयोग बरखास्त करावं आणि त्याचा संपूर्ण कारभार भाजपाच्या हाती द्यावा, असा टोला तेजस्वी यांनी लगावला आहे. इतकच नाही तर बिहारमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणूक सुद्धा निवडणूक आयोगानेच स्वार्थ साधण्यासाठी ताब्यात घेतली. यासाठी त्यांना प्रशासनातील लोकांनी मदत केली आणि भाजपा व जेडीयूचा विजय झाला, असा गंभीर आरोपही तेजस्वी यांनी केलाय.

Protected Content