सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल, डिझेलची दरवाढ

petrol

 

मुंबई (वृत्तसंस्था) आज सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली आहे. शुक्रवारी पेट्रोलचा दर ८०.४० रूपये असून त्यात ६ पैशांची वाढ झाली आहे. डिझेल १५ पैशांनी महागले असून डिझेल दर प्रति लिटर ७०.५५ पर्यंत गेला आहे.

 

दिल्लीत स्थानिक कर कमी असल्याने इतर शहरांच्या तुलनेत पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी आहेत. देशभरात जीएसटी वेगवेगळे असल्याने पेट्रोल आणि डिझेलचा दर राज्यनिहाय वेगळा आहे. ११ डिसेंबर रोजी दिल्लीत पेट्रोलचा दर ७५ रुपये होता. १९ डिसेंबरनंतर डिझेलमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यानुसार आज इंडियन ऑईलच्या दर पत्रकानुसार शुक्रवारी मुंबईत पेट्रोल दरात ६ पैशांची वाढ झाली. पेट्रोलचा दर ८०.४० रूपये झाला आहे. डिझेलसाठी ७०.५५ रुपये आहे. दिल्लीत पेट्रोल दर ७४.७४ रुपये असून डिझेलसाठी ६७.२४ रुपये मोजावे लागत आहे. आठवडाभरात पेट्रोल ११ पैशांनी आणि डिझेल २५ पैशांनी महागले आहे.

Protected Content