वरणगाव : प्रतिनिधी । वेल्हाळा येथिल तलावाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या नदीचा प्रवाह कृत्रिम पद्धतीने बदलल्यामुळे ग्रामस्थांनी आता महाजनकोच्या विरोधात आंदोलनाची भूमिका घेतली आहे
भुसावळ तालुक्यातील वेल्हाळा येथे 1952 साली पंडित जवाहरलाल नेहरू व इंदिरा गांधी यांच्या हस्ते तलावाचे उद्घाटन करण्यात आले होते या तलावामुळे परिसरातील शेतकऱ्यांचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला होता परंतु दीपनगर येथील औष्णिक वीज केंद्राच्या मनमानी कारभारामुळे या तलावाला पाणीपुरवठा करणाऱ्या नदीचा प्रवाह बंद करून या नदीचे पाणी औष्णिक वीज केंद्राला नेल्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत
दीपनगर येथील औष्णिक वीज केंद्रातील राख वेल्हाळा येथील बंडामध्ये आणून टाकली जात आहे त्यामुळे या नदीतून होणारा पाण्याचा प्रवाह हा क्षारयुक्त बनल्याने गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीमध्येही क्षारयुक्त पाणी साचत आहे त्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे
वारंवार औष्णिक वीज केंद्राच्या अधिकाऱ्यांना लेखी निवेदनही देऊन त्याच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे त्यामुळे वेल्हाळा येथील ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे