भुसावळात डेंग्यूमुळे मृत्यु झालेल्यांच्या परिवारांना मदत देण्याची मागणी (व्हिडीओ)

bhusaval morcha

भुसावळ, प्रतिनिधी | येथील पंचशिल नगरातील रहिवासी असलेला व्यावसायिक नामे परवेज अहमद शेख पिंजारी उर्फ बाबा (वय २३), याचा डेंग्यूच्या आजाराने मुंबई येथील के.एम. हॉस्पीटल येथे उपचार सुरु असतांना दि.१ डिसेंबर रोजी मृत्यु झाला. त्याच्या परिवाराला नगरपालिका व शासनाने त्वरीत २० लाख रुपये आर्थिक मदत तातडीने देण्यात यावी, अशी मागणी पंचशिल नगरवासीयांनी एका मोर्चाद्वारे मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या एका निवेदनाद्वारे केली आहे.

 

याशिवाय शनि मंदिर वॉर्ड, पासीवाडा, गंगाराम प्लॉट व शहरातील इतर ठिकाणी डेंग्युच्या आजाराने मृत्युमुखी पडलेल्यांच्या परिवारालाही प्रत्येकी २० लाख रुपये मदत देण्यात यावी, तसेच याभागात गटारी आणि कचराकुंड्या व सार्वजनिक शौचालये स्वच्छ करण्यात याव्या, बंद पडलेले पथदिवे सुरु करण्यात यावे, या भागात पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा, कारण पाणी साठवून ठेवावे लागत असल्याने त्यात डास वाढत आहेत. अशा मागण्या मुन्ना वाल्मिक सोनवणे यांच्या
नेतृत्वाखाली रहिवाशांनी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या एका निवेदनाद्वारे केली आहे. या मागण्या पूर्ण न झाल्यास नगरपालिकेवर धरणे व मोर्चा आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

 

 

Protected Content