जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । केंद्रीय विद्यालयातील मिलट्रीमधील अधिकारी बोलत असल्याचे सांगतून विद्यार्थ्यांची तपासणी करायची असे असे सांगत नवीन बसस्थानक परिसरात असलेल्या डॉक्टरला सव्वा लाखात गंडविल्याची घटना रविवारी 22 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता उघडकीस आली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील नवीन बसस्थानकामागे प्रमोद वसंत जोशी हे वृद्ध डॉक्टर वास्तव्यास आहेत. रविवारी 22 जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास त्यांना सतिष कुमार नामक केंद्रीय विद्यालयातून मिलेट्री अधिकारी नावाने फोन आला. त्या व्यक्तिने त्यांच्या शाळेतील १५० विद्यार्थ्यांची तपासणी करायची असल्याने त्याने डॉक्टर जोशी यांचा पत्ता व फोन नंबर मागविला. यावेळी डॉक्टरांनी तुम्ही देशाची सेवा करतात त्यामुळे मी तुम्हाला मोफत सेवा देईल असे सांगितले. परंतु समोरील व्यक्तीने त्यांना नकार देत आम्ही तुम्हाला एका विद्यार्थ्यांची तपासणीसाठी १५० रुपये देऊ असे सांगत त्यांनी डॉक्टरांचा विश्वास संपादन केला.
रात्रीच्या सुमारास त्या व्यक्तीने डॉक्टर जोशी यांच्या पत्नीच्या मोबाईलवर व्हिडीओ कॉल करुन तुम्हाला तपासणीचे अगाऊ पैसे टाकतो असे सांगितले. त्यानुसार समोरील व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे डॉक्टरांनी प्रोसेस केली. त्यानंतर समोरल व्यक्तीने सांगितल्याप्रमणे डॉक्टर जोशी यांनी त्याला वेळोवेळी ऑनलाईन पैसे पाठविले. डॉक्टरांनी फसवणुक करणार्या व्यक्तीला सुमारे १ लाख २४ हजार रुपये ऑनलाईन पाठविल्यानंतर त्यांनी ही घटना आपल्या मुलीला सांगितली. त्यांच्या मुलीने तुमची फसवणुक होत असल्याचे सांगितल्यानंतर डॉक्टर जोशी यांनी व्हिडीओ कॉल कट केला आणि तात्काळ जिल्हापेठ पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात रविवारी 22 जानेवारी रोजी अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.