पटना (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये गुरुवारी वादळी वाऱ्यासह वीज पडून झालेल्या दुर्घटनेत तब्बल 129 जण मृत्युमुखी पडले आहेत. तर, 50 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत.
बिहारमधील विविध जिल्ह्यांमध्ये वीज पडून आतापर्यंत एकूण 83 लोकांचा मृत्यू झाला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सर्व मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची भरपाई देण्याची घोषणा केली आहे. बिहारमध्ये मागील अनेक तासांपासून मुसळधार पाऊस होत आहे. हवामान विभागाने पुढील 2-3 दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. दुसरीकडे त्तर प्रदेशातही 32 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पीडित कुटुंबीयांना मदत निधी म्हणून तात्काळ 4 लाख रुपये देण्याचे निर्देश दिले आहेत.