वीजेच्या धक्क्याने वृध्दाचा मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील कांचन नगरात राहणाऱ्या ७५ वर्षीय वृध्दाचा टेबल फॅन सुरू करतांना वीजेचा धक्का लागून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवार १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

रतन निना साळुंखे (वय-७४) रा. कांचन नगर, जळगाव असे मयत झालेल्या वृध्दाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रतन साळुंखे हे कांचन नगरात एका पार्टेशनच्या खोलीत एकटे राहत होते. तर त्यांचे कुटुंबिय घरासमोर राहतात. मंगळवार १३ सप्टेंबर रोजी ५ वाजेच्या सुमारास टेबल फॅन सुरू करण्यासाठी उभे राहिले असता. त्यांचा हात पंख्याला लागताच हाताला विजेचा जोरदार धक्का बसला. त्यावेळी पंख्या सहित ते खाली कोसळले होते. त्यांच्या हाताला जखमा झाल्या. शेजारच्या नागरिकांनी तात्काळ धाव घेतली. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. प्राची सुरतवाला यांनी मयत घोषित केले. या संदर्भात शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली सुना असा परिवार आहे.

 

Protected Content