सावखेडा खु” येथे शेततळ्यात बुडून मध्यप्रदेश येथील मजूराचा मृत्यू

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पाचोरा तालुक्यातील सावखेडा खु” येथे मजुरी करून उदरनिर्वाहासाठी आलेल्या सेंधवा तालुक्यातील ३० वर्षाच्या मजुराचा शेततळ्यात बुडाल्याने मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी पिंपळगाव (हरेश्र्वर) पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याविषयीचे अधिक वृत्त असे की, “कालीपहाड ता. सेंधवा जि. खरगोन (मध्यप्रदेश) येथील आदिवासी समाजाचे दोन कुटुंबे गेल्या चार वर्षांपासून येथील अण्णा भिकारी परदेशी यांचे शेतात कामासाठी आले होते. दरम्यान १५ दिवसांपूर्वी त्यांचा जवळचा नातेवाईक असलेला महेश उर्फ रणतोष सुमरसिंग पावरा हा त्यांचे सोबत कामासाठी सावखेडा खु” येथे आला होता.

आज मंगळवार, दि. १३ रोजी मंगळवारी दुपारी दोन वाजता महेश व त्याचे सोबत काम करत असलेले दोन जण वरखेडी येथे दारू पिण्यासाठी आले होते. दारुच्या नशेत तर्र होवून महेश व त्याचे साथीदार सावखेडा खु” येथे गेल्यानंतर मला शेततळ्यात आंघोळ करावयाची असल्याचा त्याने आग्रह घरला शेततळ्याबाहेर कपडे काढून तो अंघोळीला तळ्यात उतरला; मात्र तळ्यात १५ फुट पाणी असल्याने तो बुडत असताना दोघ साथीदारांनी आरडाओरडा करत पळ काढला.

ही घटना शेतमालक अन्ना परदेशी यांना कळताच त्यांनी व माजी सरपंच जयसिंग परदेशी यांनी गावातील गजानन पाटील, समीर तडवी, अरुण तडवी या पोहणाऱ्यांना घटनास्थळी नेवून महेश याचा मृतदेह बाहेर काढला. सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय माळी, दिपकसिंग पाटील, उज्वल जाधव, रविंद्र वाडीले यांनी पंचनामा केला. मयताचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ अमित साळुंखे यांनी केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला व त्याचेवर राहत्या गावी कालीपहाड येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Protected Content