कारण नसतांना वृध्दाच्या डोक्यात टाकला दगड

जामनेर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जामनेर शहरातील श्रीराम मार्केट येथे कारण नसताना एका वृद्धाच्या डोक्यात दगड टाकून दुखापत केल्याची घटना बुधवारी ३१ मे रोजी दुपारी १ वाता घडली आहे. याबाबत जामनेर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जामनेर शहरातील जामनेर पुरा या भागात अमृत विठ्ठल काळे (वय-६२) हे वयोवृत्त आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान ३१ मे रोजी दुपारी १ वाजता ते शहरातील श्रीराम मार्केट येथील शिवम हॉटेल समोर उभे होते. त्यावेळी संदीप देवचंद सोनवणे (रा. दत्तनगर शहापूर ता. जामनेर) याने कारण नसताना वृध्दाच्या डोक्यात दगड टाकून गंभीर दुखापत केली. जखमी अवस्थेत झालेल्या वृध्दाला जामनेर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याबाबत सुमित प्रल्हाद काळे या तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी संदीप देवचंद सोनवणे यांच्या विरोधात जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रवींद्र बिऱ्हाडे करीत आहे.

Protected Content