विहिरीत पडलेल्या बिबट्याची रेस्क्यू टीमने केली सुटका

बुलढाणा, – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी  | लोणार, येथील वन्यजीव अभयारण्य परिसरात बिबट्यांचा वावर वाढलेला आहे. त्यामुळे शिकारीसाठी सरोवराच्या आपल्या सावजाच्या मागे लागलेला असताना बाहेरील एका पाणी नसलेल्या पडक्या विहिरीत बिबट्या पडल्याचे दिसून आल्याने वन्यजीव अभयारण्यातील अधिकाऱ्यांनी रेस्क्यू टीमला बोलावून त्याची सुटका केली.

 

लोणार सरोवर वन्यजीव अभयारण्य परिसरात बिबट्यांचा वावर वाढल्यामुळे त्या परिसरात जवळपास सात ते आठ लहान-मोठे बिबटे असल्याचे समजते. बिबट्यांना सरोवरामध्ये रानडुकराच्या शिकारी सापडतात. परंतु, काही बिबटे सरोवरा बाहेर सुद्धा शिकारसाठी येतात. असे समजते की बिबट्या आपल्या शिकारीच्या मागे धावत असताना सरोवर बाहेरील गुप्त कमळजा माता मंदिराच्या परिसरात एका पाणी नसलेल्या पडक्या विहिरीत बिबट्या पडला. त्याच्या डरकाळीमुळे आजूबाजूचा लोकांना आवाज आला. त्यांनी बघितले असता त्या पडक्या विहिरीमध्ये बिबट्या आढळून आला. ही माहिती वन्यजीव अभयारण्यातील अधिकाऱ्यांना मिळाल्याने त्यांनी रेस्क्यू टीमला पाचारण केले. त्यानंतर त्यांनी येऊन विहिरीमध्ये पिंजरा सोडणे, अगोदर शिडी लावली. शिडी लावताच बिबट्या तीस सेकंदात विहिरीबाहेर पडला. डोळ्याची पापणी लावता ना लावता तो पसार झाला. दुपारी त्याला विहिरीतून काढण्यात रेस्क्यू टीमला यश आले. याठिकाणी लोकांनी गर्दी केली होती. ती रोखण्यासाठी लोणार पोलीस ठाण्याचे कर्मचारी तर रेस्क्यू टीममध्ये समाधान मांटे, संदीप मडावी, पवन वाघ, दिपक गायकवाड, प्रवीण सोनवणे, सागर भोसले, लोणार येथील वन परिक्षेत्र अधिकारी सुशांत पाटील, मेहकर वन क्षेत्र अधिकारी सावळे, वनपाल कायंदे, वनरक्षक चौधरी, विष्णू ढाकणे यांनी परिश्रम घेतले. लोणार परिसरातील रेस्क्यू टीमची ही दुसरी कामगीरी आहे. यापूर्वीसुद्धा एका शेतातील जाळीमध्ये अडकलेल्या बिबट्याला सुखरूप बाहेर काढण्यात त्यांना यश आले होते.

Protected Content