यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल शहरातील विस्तारीत भागात नागरीकांना मुलभूत सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. यात गटारी, रस्ता, सांडपाण्याचा निचरा यासह अनेक समस्या आहे. या समस्या तातडीने सोडवाव्यात अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारात स्थानिक रहिवाशी यांनी यावल नगरपारिषदेला निवेदन देवून केली आहे.
यावल शहरातील विस्तारीत भाग हा प्रभाग क्रमांक ३ मध्ये येतो. या प्रभागातील गणपती नगर, आयेशानगर, तिरुपती नगर, वासुदेवनगर, गंगानगर येथे रस्ते, गटारी नसल्यामुळे सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. पावसाच्या पाण्याने या भागातील रहीवासी क्षेत्र व प्रमुख मार्गावर चिखल व घाणीचे साम्राज्य पसरत आहे. अशा घाणीच्या चिखलमय रस्ते व वातावरणातून लहान चिमकुल्या विद्यार्थांना शाळेत जावे लागत आहे. शिवाय या परिसरात राहणाऱ्यांना या वातावरणाचा त्रास सोसावे लागत आहे. नगर परिषद प्रशासनाने या विषयाची तात्काळ दखल घेऊन कार्यवाही करावी, अन्यथा येत्या १५ जुलै नगरपरिषदेसमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदन देतांना अशपाक शहा, नजीब शेख वाहेद अयाजोद्दीन शेख, वसीम पटेल, अनिस शेख दानिश शेख आसिफ, आमिर खान, सद्दाम शहा, महेमुद खान, हाबीज खान यांच्यासह आदी विस्तार क्षेत्रातील राहणाऱ्या नागरीकांची उपस्थिती होती.