विवेकानंद प्रतिष्ठान प्राथमिक शाळेत ‘शिवजयंती’ उत्साहात साजरी

 

जळगाव, प्रतिनिधी   विवेकानंद प्रतिष्टान प्राथमिक शाळा वाघनगर येथे   छत्रपती शिवाजी : The CEO या व्याखानासह, चित्रकला व पुस्तक प्रदर्शनी,पोवाडे,विद्यार्थी मनोगत आदी कार्यक्रमासह शिवजयंती उत्साहात साजरी   करण्यात आली.            

विवेकानंद प्रतिष्ठान प्राथमिक शाळा वाघनगर, शाळेत  गुरुवार दि. १८ रोजी  ‘शिवजयंती’ उत्साहात साजरी करण्यात आली.या प्रसंगी शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या ध्ये चित्रकला प्रदर्शन, शिवरायांच्या संबधित पुस्तक प्रदर्शनी मांडणी, पोवाडे तसेच व्याखान आदीं कार्यक्रमांचा  समावेश होता.      

शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक हेमराज पाटील, प्रमुख पाहुणे गिरीश पाटील, समन्वयिका वैशाली पाटील, जयश्री वंडोळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून चित्रकला व  पुस्तक प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले. या प्रदर्शनीचे नियोजन गणेश वंडोळे , योगेश रत्नपारखी यांनी केले.  यामध्ये इ ५ वी ते ९वी च्या विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या जीवनावरील विविध विषयांवर चित्रे काढली होती.  शिवरायांचे विचार, युद्धनीती ,व्यवस्थापन, गनिमी कावा, स्फूर्ती गीते, पोवाडे, किल्ले गड यांची माहिती असणारे पुस्तके मांडण्यात आली होती. आयुष पाठक, हेरंब कुलकर्णी यांनी पोवाडा सादर केला.

शिवजयंतीच्या निमित्ताने विद्यार्थांनी आपल्या मनोगतातून शिवराय व त्याच्या कार्याचा महिमा व्यक्त केला. याप्रसंगी चैताली पाटील, तारका महाजन, संस्कृती हटकर, युगांत बेहरे, कोमल कुंभार, ओजस्वी पाटील, समृद्धी सोळंके, यांनी मनोगत व्यक्त केले. 

प्रमुख पाहुणे गिरीश पाटील यांनी  व्याख्यानातून छत्रपती शिवाजी :The CEO या विषयाला अनुसरून विद्यार्थाना मार्गदर्शन केले. शिवाजी महाराजांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केले आणि मुठभर सहकार्याच्या मदतीने ते इतिहासदत्त कार्य केले. असे करण्यासाठी लागणारी धीरोदत्त वृत्ती, संकटाशी मुकाबला करण्यासाठी करावे लागणारे बिनचूक नियोजन आणि त्या नियोजनाप्रमाणे काम पार पाडण्यासाठी आवश्यक असलेले व्यवस्थापन हे गुण त्यांच्या ठायी होते म्हणूनच हे शक्य झाले. त्यांच्या अंगी असलेल्या या गुणांचा अभ्यास, विश्लेषण आणि अनुकरण करणे आजही आवश्यक आहे.या गोष्टीचे पालन आपण करावे असे आवाहन केले. अध्यक्ष  हेमराज पाटील यांनी सांगितले की, प्रजेला सवलती देणारा राजा ही संकल्पना त्या मध्ययुगात क्रांतिकारक ठरलेली होती म्हणूनच शिवाजी महाराजाविषयी असे म्हटले जाते की राजे तर अनेक होऊन गेले पण त्यातल्या कोणत्याही राजाला प्रजेने देवाचा अवतार मानलेले नव्हते. शिवाजी महाराजांना मात्र जनतेने देवाचा अवतार मानलेले होते. आपणही शिवरायांचे महान कार्य आपल्याला जी प्रेरणा देते त्याचा वापर आपण आपल्या सार्वत्रिक जीवनात करावा असे सांगितले.

शिवजयंती कार्यक्रमाचे प्रमुख सचिन गायकवाड यांनी नियोजन केले. कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक हेमराज पाटील यांचे मार्गदशर्न लाभले. सुत्रांचालन  सचिन गायकवाड यांनी केले तर आभार आकाश शिंगाणे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी समन्वयिका वैशाली पाटील तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

Protected Content