विरोधकांनी सहकारी संस्था डबघाईला आणल्या

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर आणि यावल तालुक्यातील सहकार क्षेत्रातील जाणकार जेष्ठ नेत्यांनी अतिश्य कष्ठाने शेतकऱ्यांच्या हितासाठी उभ्या केलेल्या आघाडीच्या सहकारी संस्था विरोधकांनी केवळ राजकारण करीत ताब्यात घेतल्या व आर्थिक गोंधळात टाकुन डबघाईला आणुन त्यांची वाट लावली हे पाप कुणी केले, हे सर्वांना कळून चुकले आहे. येणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडी बहुमताने सत्तेत येईल असा विश्वास रावेर यावल विधानसभा क्षेत्राचे आ.शिरीष मधुकरराव चौधरी यांनी यावलच्या तालुका खरेदी विक्री सहकारी संघाच्या सभागृहात संपन्न झालेल्या महाविलास आघाडीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानाहुन व्यक्त केला.

 

महाविकास आघाडीच्या घटक पक्षाच्या उमेदवारांची उमेदवारी निश्चित करण्यासाठी तात्काळ एक समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे यावेळी बैठकीत जाहीर करण्यात आले. यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुढील महीन्यात होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकी संदर्भात विचारविनिमय करण्यासाठी महाविकास आघाडीचे घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, (ठाकरे गट) शिवसेना आणी राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाची संयुक्त बैठक आज दुपारी ४ वाजता पार पडली .या वैठकीस आमदार शिरीष चौधरी, माजी आ. रमेश चौधरी, राष्ट्रवादीचे जेष्ठ जिल्हा उपाध्यक्ष गिरधर पाटील, सरचिटणीस विजय पाटील, यावल नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष राकेश कोलते, उपनगराध्यक्ष अस्लम शेख नबी, शिवसेनेचे कृउबाचे माजी सभापती भानुदास चोपडे, कृउबाचे माजी संचालक सुनिल बारी, माजी सभापती नितिन चौधरी, केतन किरंगे यांच्यासह जिल्हा परिषदचे गटनेते प्रभाकर सोनवणे, पंचायत समितीचे गटनेते शेखर पाटील, मोहराळा सरपंच नंदा महाजन, राष्ट्रवादी महीला आघाडीच्या तालुकाध्यक्ष प्रतिभा निळ, कृउबाचे माजी संचालक विनोदकुमार पाटील, पुंजो पाटील, सत्तार तडवी, सुनिल बारी यांच्यासह राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा.मुकेश येवले, शिवसेनेचे आर.के.चौधरी, खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन सुनिल फिरके, कॉंग्रेसचे हाजी गप्फार शाह, मनोहर महाजन, बापु जासुद, अरुण लोखंडे, नईम शेख, डॉ. हेमंत येवले, वसंत गजमल पाटील, दहिगावचे माजी सरपंच दिलीप पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने महाविकास आघाडीतील पदधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. बैठकीचे सुत्रसंचालन प्रा. मुकेश येवले व शेखर पाटील यांनी केले तर उपस्थितांचे आभार राष्ट्रवादीचे नाना बोदडे यानी मानले.

Protected Content