शरद पवार यांच्या जिल्हा दौऱ्यासंदर्भात उद्या यावलला बैठक

sharad pawar in jalgaon

यावल, प्रतिनिधी । राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार हे १५ फेबुवारी रोजी जळगाव जिह्वा दौऱ्यावर येत असल्याच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उद्या (दि. १४) तालुका पातळीवर पक्ष कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक आयोजीत करण्यात आली आहे.

त म्हटले आहे की , राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार शरदचंद्र पवार हे दिनांक १५फेब्रुवारी रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असुन , या निमिताने राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व विषयांवर सविस्तर चर्चा आणि नियोजन करण्यासाठी यावल तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने यावल येथे दिनांक १४ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.०० वाजता यावल शेतकी संघाच्या सभागृहात महत्वपुर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला पक्षाचे विविध आघाडी अध्यक्ष , पदाधिकारी , सदस्य व कार्यकर्त्यांनी हजर राहावे असे आव्हान यावल शहर राष्ट्रवादी पक्ष , फैजपुर शहर शाखा आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रा. येवले यांनी केले आहे.

Protected Content