यावल : प्रतिनिधी । नव्याने रुजु झालेले तहसीलदार महेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज महसुल प्रशासनाने विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत अनधीकृत वाळुची वाहतुक करणाऱ्या तिन ट्रॅक्टरवर कारवाई केली
तहसीलदार यांनी केलेल्या या कारवाईमुळे वाळु माफीयाचे धाबे दणाणले आहे . नुकतेच तहसीलदार म्हणुन पदभार स्विकारलेले महेश पवार यांनी यावल तालुक्यातील वाळु माफीयाना निशाण्यावर घेतले असुन , आज निवासी नायब तहसीलदार आर .के .पवार , नायब तहसीलदार आर.डी . पाटील , जे .डी.बंगाळे (मंडळ अधिकारी फैजपुर), सचिन जगताप (मंडळ अधिकारी किनगाव ), एम .पी . देवरे, (मंडळ अधिकारी भालोद ), ईश्वर कोळी ( तलाठी यावल) , टी .सी . बारेला (तलाठी मालोद) , आर.के. गोरटे (तलाठी आडगाव) व किनगाव येथील तलाठी पी .एन . पाटील यांच्या पथकाने किशोर पाटील ( रा .आडगाव) यांचे ताब्यातील ट्रॅक्टर(क्र एम .एच .१९ एपी ९७३५ , २ ), शब्बीर अब्बास तडवी (रा. बोरखेडा ) यांचे ट्रॅक्टर (क्र एम .एच .२७ एपी २३६४ ), व दिनेश गजरे ( रा . यावल) यांच्या ताब्यातील ट्रॅक्टर (क्र एमएच १९ बी जी ४१११ ) या तिन्ही वाहनामधुन विना परवाना बेकायद्याशीर गौण खनिजाची वाहतुक करतांना पकडण्यात आले या तिघ वाहन मालकावर ३ लाख ५० हजार रूपयांपर्यंत दंडात्मक कारवाई होणार असल्याचे कळते