दुचाकींची जोरदार धडक : दोन तरूण ठार

वरणगाव, ता. भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथून जवळच असलेल्या फुलगाव फाट्याजवळ दोन दुचाकींची रात्री उशीरा समोरा-समोर धडक झाली असून यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

या संदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, काल रात्री साडेनऊच्या सुमारास फुलगाव फाट्याजवळ दोन मोटारसायकल स्वारांनी एकमेकांना धडक दिली. यात दोन्ही जण गंभीर जखमी झाले. या जखमींना वरणगावच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता त्यांना डॉक्टर्सनी मृत घोषीत केले.

या भीषण अपघातात विजय रामकृष्ण महाजन ( वय ४७, रा. फुलगाव ) आणि ललित दांडे (वय ३५ रा. वरणगाव ) या दोघांना आपले प्राण गमवावे लागले. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत त्यांना ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू होतांनाच त्यांनी शेवटचा श्‍वास घेतला. फुलगाव फाट्यावर अनेक लहान-मोठे अपघात होत असल्याने येथे सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी कधीपासून होत असली तरी याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.

दरम्यान, दोन्ही मृतांच्या पार्थिवाचे आज सकाळी शवविच्छेदन करण्यात येणार असल्याची माहिती वरणगाव पोलीस स्थानकाच्या सूत्रांनी दिली आहे.

Protected Content