विधानसभेत विरोधकांचा सभात्याग : राहूल गांधी यांच्यावरील कारवाईचा निषेध

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राहूल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचे पडसाद आज विधानसभेच्या कामकाजात पडला असून आज विरोधकांनी यावरून सभात्याग केला.

 

केंद्र सरकारच्या निषेधार्थ विरोधकांनी तोंडाला काळ्यापट्ट्या लावून आज विधान भवन परिसरात आंदोलन केलंय. विरोधकांची मुस्कटदाबी होतेय, देशात हुकूमशाही असल्याचा आरोप करत विरोधकांनी सत्ताधार्‍यांना धारेवर धरले आहे. यानंतर विधानसभेतही याचे पडसाद उमटले. आज विरोधकांनी सभात्याग केला आहे. सभात्याग केल्यानंतर विरोधकांनी विधान भवन परिसरातून संयुक्त पत्रकार परिषद घेऊन सरकारवर जोरदार टिकास्त्र सोडण्यात आले.

 

याप्रसंगी बाळासाहेब थोरात म्हणाले की, राहूल गांधी हे आज आमचे राष्ट्रीय नेते आहेत, उद्या त्यांच्याकडेही राष्ट्रीय नेते आहेत. आज आमच्याकडेसुद्धा पायताणं आहेत हे विसरून चालणार नाही. या सगळ्या गोष्टींचा विचार करता अध्यक्षांनी कडक अशी कारवाई करावी, असा आग्रह आम्ही धरलेला होता. आमच्या काही सदस्यांकडून चुकलं असेल तर त्यांच्यावरही कारवाई करा, परंतु ही जी नवी पद्धत पडते आहे, त्यामुळे कोणत्याही पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांच्या बाबतीत अशा पद्धतीने पुढेही घडण्याची शक्यता आहे. म्हणून आपण हे कुठे तरी बंद केलं पाहिजे. हे कृत्य ज्यांनी केलं, त्यांना शिक्षा केली पाहिजे, असा आग्रह आम्ही धरलेला होता. ही जबाबदारी अध्यक्षांची आहे, त्यांनी निरपेक्ष राहिले पाहिजे आणि निरपेक्ष राहून निर्णय दिले पाहिजेत असेही बाळासाहेब थोरात म्हणाले.

Protected Content