जळगाव, प्रतिनिधी । ११ वी ‘भारतीय छात्र संसद’चे दि.२३ ते २८ सप्टेंबर २०२१ या कालावधीत ऑनलाइन आयोजन करण्यात आले असून या छात्र संसदेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन पत्रकार परिषदेत करण्यात आले.
भारतीय छात्र संसद फाऊंडेशन, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सहा दिवसांच्या भारतीय छात्र संसदेचे दि.२३ ते २८ सप्टेंबर २०२१ दरम्यान ऑनलाइन आयोजन केले आहे. भारत सरकारचे केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय आणि असोशिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज आणि मानवाधिकार, लोकशाही, शांतता आणि सहिष्णुतासाठीचे युनेस्को अध्यासन यांच्या मदतीने ही छात्र संसद होत आहे.
महपौर जयश्री सुनील महाजन, कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण विभाग संचालक डॉ. पंकज नन्नवरे, रायसोनी इन्स्टिट्यूट संचालिका डॉ. प्रीती अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी विद्यार्थांनी या संसदेत सहभाग घ्यावा असे आवाहन केले. तर डॉ. नन्नवरे यांनी राष्ट्रीय सेवा योजनच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना यात सहभागासाठी विद्यापीठाकडून प्रयत्न केले जातील असे सांगिलते. महापौर जयश्री महाजन यांनी विद्यार्थ्याच्या जडणघडणीत छात्र संसद महत्वाची भूमिका बजावत असल्याचे सांगितले. यावेळी महाराष्ट्र राज्य विद्यार्थी समन्वयक विराज कावडीया, जळगाव जिल्हा विद्यार्थी समन्वयक मानसी भावसार आदी उपस्थित होते.
छात्र संसद हा अ-राजकीय उपक्रम त्याचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही. छात्र संसद हा भविष्यातील राजकीय नेते घडविणार एकमेव व विशाल प्रशिक्षण वर्ग आहे. या संसदेच्या माध्यमातून राजकारण, राजकीय नेते, लोकशाहीकडे बघण्याचा युवकांचा दृष्टिकोन बदलत आहे. या अकराव्या छात्र संसदेत देशभरातील वेगवेगळ्या महाविद्यालयातील २५ हजारांहून अधिक उत्साही विद्यार्थी सहभागी होणार आहेत. ९ राज्यांतील ४५० विद्यापीठांतील २५ हजार महाविद्यालयातून राजकीय व सामाजिक क्षेत्रा क्रियाशील विद्यार्थ्यांचा थेट सहभाग. १२ केंद्रीय मंत्र्यांचा सहभाग असेल. भारतातील १० राज्यातील विधानसभांच्या सभापतींचा सहभाग.भारतातील विविध राज्यातील ४० आमदारांचा सहभाग. देशातील ३० नामवंत विचारवंत विद्यार्थ्यांशी संवाद साधून मार्गदर्शन करतील. या संसदेत देशभरातील ६० विद्यार्थी वक्त्ये असतील. विद्यार्थ्यांनी आपले नाव www.bhartiyachhatrasansad.org, वेबसाईटवर नोंदणी करावी. तसेच माहितीसाठी http://www.bhartiyachhatrasansad.org | mitsog.org/mitwpu.edu.in या संकेतस्थळांना भेट अशी माहिती यांनी पत्रकार परिषदेत देण्यात आली.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/549646356063640