Home धर्म-समाज हडसन जि.प. शाळेत जागतिक वृक्षसंवर्धनानिमित्त वृक्षरोपण

हडसन जि.प. शाळेत जागतिक वृक्षसंवर्धनानिमित्त वृक्षरोपण

0
42

पाचोरा प्रतिनिधी । नांद्रा ता. पाचोरा येथुन जवळच असलेल्या हडसन जि. प. शाळेत जागतिक वृक्ष संवर्धनानिमित्ताने वृक्षरोपण करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम जि. प. सदस्य पदमसिंग पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी प्रमुख पाहूने म्हणून पंचायत समितीचे माजी सभापती तथा सदस्य बंन्सीलाल पाटील, गटविकास अधिकारी अतुल पाटील, गटशिक्षाणाधिकारी विकास पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी समाधान पाटील, सरपंच दिपाली पाटील, शालेय समिती अध्यक्ष चंद्रसिंग पाटील, सुरेश पाटील, राजेंद्र पाटील, देविदास पाटील, हिरालाल पाटील, माजी सरपंच शरद पाटील, संजय पाटील, ज्ञानेश्वर पाटील, साईनाथ सोनवणे, गव्हरमेन्ट कॉन्ट्रँक्टर किरण पाटील, निंबा पाटील, रामचंद्र पाटील, ईश्वर पाटील, निंबा पाटील, केंद्रप्रमुख धिरज पाटील, मुख्यध्यापक दिलीप पाटील, उपशिक्षिका तारावंती नन्नवरे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. शाळेला वॉलकुंपनाचे उत्कृष्ट काम झाल्यामुळे शाळेच्या आवारात वृक्ष लागवडीची संकल्पना केंद्र गटशिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी मांडल्याने मुख्यध्यापक दिलीप पाटील यांनी लोकवर्गणीतुन संपुर्ण आवारात विविध जातीचे वृक्ष लागवड करण्यात आले.

 


Protected Content

Play sound