यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील बस आगाराच्या परिसरातील चहा दुकानाराने विद्यार्थीनीची छेड काढल्याच्या कारणावरुन दुकानाचा परवाना रद्द होणार असल्याचे वृत्त प्राप्त झाले असुन , यावल एसटी आगाराचे व्यवस्थापक दिलीप महाजव यांच्याकडुन या संदर्भातील माहीती जिल्हा विभागीय नियंत्रक यांना पाठवण्यात आली आहे.
या संदर्भातील वृत्त असे की] यावल बसस्थानकाच्या आवारात मागील अनेक वर्षापासुन अशोक एन दुधानी (वय ४९) रा. भुसावळ याने आपल्या एसटी आगारातील काही आजी-माजी कर्मचारी व बेकायद्याशीर व्याजाचा व्यवसाय करणाऱ्या मित्रमंडळीच्या सहकार्याने या अशोक दुधानीला चहाच्या दुकानाचा परवाना मिळवला असल्याचे बोलले जात आहे .
या चहाच्या दुकानाच्या नांवाखाली व्याजाने पैसे देण्याघेण्याचा व्यवसाय देखील या ठिकाणी चालत असल्याचे वृत्त आता मिळत आहे. या सर्व आर्थिक व्यवहारास चालविण्यासाठी नेहमीच मुलीची छेड काढणाऱ्या वृत्तीच्या चहा विक्री करणाऱ्या अशोक दुधानीची मदत मिळत असल्याची चर्चा परिसरात होत आहे. चहा विक्रीच्या नांवाखाली या अशोक दुधानी ने या पुर्वी देखील अशाच प्रकारे यावल बसस्थानकाच्या परिसरात विद्यार्थीनींची व प्रवासी महीलांची छेड काढलेली असुन , या प्रकारातुन आपली बदनामी होईल या भितीपोटी कुणी तक्रार करत नव्हते , पण आज दिनांक ५ जानेवारी रोजी सकाळी १oवाजेच्या सुमारास अशोक दुधानी यांनी विद्यार्थीची छेड काढली व ही छेड त्याच्या अंगाशी आली असुन, यावल पोलीस ठाण्यात त्याच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असुन , या चहा विक्रेत्याचा कायमचा बसस्थानकावरील दुकानाचा परवाना रद्द करावा अशी मागणीच करण्यात आली असून , आगार प्रमुख दिलीप महाजन यांनी अशी माहीती वरिष्ठ विभाग नियंत्रक पातळीवर पाठवली आहे . त्यामुळे या चहा विक्री करणाऱ्या दुकानदाराचा परवाना कायमचा रद्द होणार असल्याचे वृत्त प्राप्त झाले आहे .