जळगावातील लाठी शाळेतील पालिका कार्यालयातून ६९ हजारांचा ऐवज लंपास

जळगाव प्रतिनिधी । ढाकेवाडी येथील लाठी शाळेतील पालिकेच्या घरपट्टी वसुली कार्यालयात चोरट्यांनी सोमवारी (६ जूलै) हातसफाई केली. या कार्यालयातील संगणासह इतर ६९ हजार रुपयांच्या साहित्याची चोरट्यांनी चोरी केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ढाकेवाडी येथील निर्मलाबाई शिवचंद्र लाठी शाळेत महापालिकेचे कार्यालय आहे. या कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासह गेटचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. या चोरट्यांनी कार्यालर्यातील तीन संगणक, दोन प्रिंटर, एक इनर्व्हटर व एक राऊटर असे ६९ हजार रुपयांचे साहित्य चोरट्यांनी चोरुन नेले. दरम्यान, चोरट्यांनी या कार्यालयातील सर्व सामान अस्ताव्यस्त केला आहे. मंगळवारी सकाळी कार्यालयातील कर्मचारी महेंद्र भालेराव, शेखर गोजरेकर, संजय सपकाळे, छबीलदास इंगळे, राजेश भुतडा, हिरालाल सोनवणे, बालाजी ओडंबे, युवराज सपकाळे हे काम करण्यासाठी आले असता हा प्रकार उघडकीस अाला. रात्रीतून चोरट्यांनी कार्यालयात चोरी केल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. या प्रकरणी महेंद्र भालेराव यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content