शामवाडी शिवारातून शेतकऱ्याच्या दुचाकीची चोरी; पोलीसात गुन्हा

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील शामवाडी शिवारात शेतकऱ्याच्या घरासमोर लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, गजानन रामभाऊ पाटील (वय-४०) रा. शामवाडी शिवार ता.चाळीसगाव जि.जळगाव हे शेतकरी असून शेताच्या कामासाठी त्यांच्याकडे (एमएम १९ एएल ९४८७) क्रमांकाची दुचाकी आहे. १ जून रोजी रात्री ९ वाजता त्यांनी त्यांची दुचाकी पार्किंगला लावली होती. २ जून रोजी सकाळी ४ वाजेच्यापुर्वी अज्ञात चोरट्यांनी ८ हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेली. परिसरात शोध घेवून दुचाकी आढळून आली नाही. गजानन पाटील यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीसात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ युवराज नाईक करीत आहे.

Protected Content