जळगाव कोविड केअर युनिटच्या तपासणी शिबिरास प्रतिसाद

जळगाव प्रतिनिधी । जळगाव कोविड केअर युनिटतर्फे मेहरूण परिसरात सहा दिवसा पासून कोरोनाचा प्रसार वाढू नये म्हणून सर्वेक्षण व तपासणी शिबिर सुरू असून याला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला आहे.

मंगळवारी मील्लत हायस्कूल परिसर, जोशीवाडा, जुना मेहरूण भाग या परिसरातील ५२४५ लोकांचे सर्वेक्षण करून यातील ६०२ लोकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. याचे उदघाटन डॉ मंधान पंडित,डॉ प्रभा बडगुजर,रफिक शाह, जमील देशपांडे, गफ्फार मलिक,मुफ्ती हारुन नदवी ,मुफ्ती अतिकुर रहेमान, प्रशांत नाईक, साहिल पटेल, जाबिर शेख, मतीन पटेल,मुश्ताक मिर्झा, डॉ जावेद शेख,अनवझर खान यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले.डॉ मंधान पंडित व डॉ प्रभा बडगुजर यांना उदघाटन साठी आमंत्रित केले होते. परंतु त्यांनी उदघाटन झाल्यावर स्वयंस्फुर्तीने सर्व डॉक्टर सोबत शिबिरातील रुग्णा ची तपासणी केली व उपस्थित सर्व जनरल प्रॅक्टिस करणारे बियुएमएस व बीएएमएस यांना मार्गदर्शन केले.

सहा दिवसा पासून सेवारत डॉ फारूक शेख व डॉ सौ सायका शेख, डॉ फिरोज अहेमद व डॉ सौ नसीम शेख, डॉ निशात कौसर, डॉक्टर रियाज शेख, डॉक्टर जावेद शेख, डॉ मिनहाज पटेल, डॉ सईद अहेमद,डॉ इरफान खान,डॉक्टर अझीझुल्ला शेख, डॉक्टर मोईज देशपांडे, डॉक्टर असीम खान, डॉक्टर कामील शेख, डॉक्टर वसीअहमद, डॉक्टर फारुख सलीम, डॉक्टर रइस कासार, डॉक्टर रिजवान खाटीक, डॉक्टर रमीज खाटीक, डॉक्टर एजाज शाह, डॉक्टर जावेद मोसिर खान, डॉक्टर नसीम फिरोज खान,डॉ नदीम नजर,डॉ नदीम रहेमानी,डॉ वसीम शाह डॉ तौसिफ बिस्मिल्लाह,डॉ इकबाल शेख,डॉ अलीम बागवान, डॉ आफ्रिन शेख, डॉ कु सायमा अस्लम खान, डॉ मतीन खाटीक, डॉ वसीम शाह, डॉ अब्दुल वहाब यांनी सेवा प्रदान केली आहे.

हे तपासणी शिबिर यशस्वी व्हावे म्हणून आमिर शेख, अर्षद शेख व साबीर शेख यांच्या नेतृत्वात अझर हुसेन,मुजाहिद खान,अकिल शेख इब्राहिम पिरजादे, व शेख अझीम यांनी नोंदणी चे कार्य पार पडले. तर अतिक शेख च्या नेतृत्वात हुजेफा शेख,खालिद शेख,हमजा शेख,सैयद वसीम,उमर मुख्तार व फैझान शेख यांनी औषधी वाटप केले.

दरम्यान, आता नशिराबाद येथेही ही तपासणी करण्यात येणार असून नशिराबाद येथील परिसरातील लोकांनी मोठ्या प्रमाणात सर्वेक्षणाला सहकार्य करावे असे आवाहन केअर युनिटचे मार्गदर्शक मुफ्ती आतिकुर रहेमान,अध्यक्ष गफ्फार मलिक, समन्वयक डॉक्टर जावेद शेख व जनसंपर्क प्रमुख फारूक शेख यांनी केले आहे.

Protected Content