सावधान… तुमची पण अशी फसवणूक तर होत नाही ना !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सरकारी नोकरीचे आमिष दाखवत पैसे देवून एकाला चांगलाच फटका बसला आहे. सरकारी नोकरीसाठी जळगावातील एकाला ४ लाख ४० हजारांमध्ये चुना लावला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रदीप चिंतामन ससाणे (वय-५२) रा. गोकुळ नगर, जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. प्रदीप ससाणे हे खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. प्रदीप ससाणे यांचे भाचा व मुले हे चांगले उच्च शिक्षीत असल्याने त्यांच्यासाठी नोकरीची शोधाशोध सुरू केली. शासकीय नोकरीत लावून देण्याची माहिती भुषण शरद पाटील रा. खाजोळा ता.पाचोरा यांनी माहिती दिली. आपली आरोग्य सेवक, रेल्वे, म्हाडा, वाहन चालक, रेल्वे गृप डी अशाा विभागामध्ये आपली चांगली ओळख असल्याचे भासवत सरकारी नोकरी लावून देण्याचे भासवत संशयित आरोपी भुषण पाटील याने प्रदीप ससाणे यांच्याकडे पैश्यांची मागणी केली. त्यानुसार ससाणे यांनी वेळोवेळी अस एकुण ४ लाख ४० लाख रूपये अदा करण्यात आले. दरम्यान, मुलांना नोकरीची कोणतीही आर्डर न देता फसवणूक केल्याचे लक्षात आले. प्रदीप ससाणे यांनी तातडीने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी भुषण शरद पाटील रा. खाजोळा ता. पाचोरा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार करीत आहे.

Protected Content