विद्यापीठ करणार नवोदयोजकांना मार्गदर्शन : १५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विदयापीठाच्या इनक्युबेशन केंद्राव्दारे नवीन उदयोग उभारण्यासाठी नाविन्यपूर्ण कल्पना नवउदयोजकाकडून मांगविण्यात आल्या आहेत. तरी इच्छुकांनी १५ फेब्रुवारीपर्यंत सादर करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

 

 

कवयित्री बहिणाबाई विदयापीठात कौशल्यविकास आणि उदयोजकता विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या सहकार्याने इनक्युबेशन सेंटर सुरु करण्यात आले आहे. खान्देशात उदयोजकीय विस्तार व्हावा यासाठी सेंटर कार्य करत आहे. गेल्या वर्षभराच्या काळात केसीआयआयएलने कृषी, आरोग्य, अन्नप्रक्रिया, सायबर आदी क्षेत्रात काम करणाऱ्या २० पेक्षा अधिक स्टार्टअपना मदत केली आहे. या पार्श्वभूमीवर मार्च २०२२ पासून नवीन बॅच सुरु होणार आहे. उदयोग सुरु करण्यासाठीच्या नवीन कल्पना मागविण्यात आल्या आहेत. नव उदयोजक होऊ इच्छिणाऱ्यांनी https://forms.gleGHUozvdrrRryU६zY८ येथे अर्ज करावेत. या केंद्राकडून उदयोगासाठी तांत्रिक आणि व्यावसायिक मार्गदर्शन प्रयोगशाळेची सुविधा, बाजारपेठेचे मार्गदर्शन पेट्टसाठी मार्गदर्शन आणि अर्थ सहाय्य केले जाणार आहे. १५ फेब्रुवारीर्यंत इच्छूकानी अर्ज करावेत आणि अधिक माहिती करीता मुख्य कार्यकारी अधिकारी मनवीन चढ्ढा, मो. नं. 8384002154 आणि व्यवस्थापक निखिल कुळकर्णी मो. नं. 9970016211यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केंद्राचे संचलाक प्रा. भूषण चौधरी यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

Protected Content