अज्ञात वाहनाच्या धडकेत कुऱ्हाड येथील शेतकऱ्याचा मृत्यू

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथे मुलीला भेटण्यासाठी दुचाकीने निघालेल्या एकाला भरधाव अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने मृत्यू झाल्याची घटना कुऱ्हाड बुद्रुक ते म्हसास दरम्यान घडली आहे. याबाबत पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

अनिल शांताराम चौधरी (वय – ४६) असे मयताचे नाव असून अनिल चौधरी हे मुलीची डिलेव्हरी झालेली असल्याने तिला जळगांव येथे भेटण्यासाठी जात असतांना कुऱ्हाड बु” ते म्हसास दुचाकीने जात असतांना बुधवारी ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास भरधाव वेगाने येणाऱ्या चार चाकी वाहनाने जोरदार धडक दिली. यावेळी गंभीर जखमी झाले होते. त्यांना गावातील काही नागरिकांनी उपचारासाठी पाचोरा येथे दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी मयत घोषीत केले. मयतावर गुरुवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत अनिल चौधरी हे नामांकित पहिलवान होते. ते शेती व्यवसाय करुन गुरांचा व्यापार करीत होते. गेल्या वर्षीच त्याचा मोठा भाऊ सुनिल याचे निधन झाले होते. मयताचे पश्चात वृद्ध आई, एक भाऊ, पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. धडक देणारा वाहन चालक आपल्या वाहनासह पसार झाला असून घटनेप्रकरणी अज्ञात वाहन धारकाविरुद्ध पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनमध्ये अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content