पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | आदिवासी विभाग तर्फे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत जिल्ह्यातील ५० आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे अध्यक्षस्थानी होत्या. महाराष्ट्र शासन आदिवासी विभागातर्फे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत जिल्ह्यातील शासकीय आणि अनुदानित शाळेतील ५० शाळेतील विद्यार्थी खेळाडूंच्या क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. त्याचे उद्घाटन कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून क्रीडा संचालक डॉ. दिनेश पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे उपस्थित होत्या. यावेळी व्यासपीठावरून बोलतांना डॉ. विनोद पाटील म्हणाले म्हणाले की, आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये उपजतच खेळाचे गुण असतात त्यामुळे याहीपेक्षा मोठ मोठ्या खेळांमध्ये भाग घेऊन आपले नाव उंच करावे. असे आवाहनही त्यांनी खेळाडूंना याप्रसंगी केले.
यावेळी प्रकल्प अधिकारी विनोद विनिता सोनवणे, क्रीडा संचालक डाॅ. दिनेश पाटील यांनी मनोगत केले. या क्रीडा स्पर्धा दि. २६ नोव्हेंबर ते दि. २८ नोव्हेंबर पर्यंत चालणार असून, विद्यापीठाचे भव्यदिव्य आवार बघितल्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाविषयी एक आगळे वेगळे आकर्षण निर्माण झाल्याचे चित्र काही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी बोलून दाखवले. आदिवासी विभागाच्या भव्य दिव्य स्पर्धा जिल्ह्यात प्रथमच होत असल्याने आदीवासी विभाग ही सर्वांच्या बरोबरीने शैक्षणिक कामात बरोबरी करतो असे या ठिकाणी दिसून आले.
याप्रसंगी सहायक प्रकल्पाधिकारी पी. पी. माहुरे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी पवन पाटील, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी एल. एम. पाटील, मीनाक्षी सुलताने, वरिष्ठ लिपिक प्रशांत झांबरे, हिरालाल पवार उपस्थित होते.
याप्रसंगी संविधान दिनानिमित्त भूपेंद्र पाटील यांनी संविधान वाचन केले. तसेच जिल्ह्यातील मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक, तसेच अधीक्षक, अधीक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पी. पी. पाटील यांनी तर उपस्थितांचे आभार व्ही. टी. राठोड यांनी मानले.