भारतीय महिला संघाचा विडिंजवर दणदणीत विजय

indian teem women

 

मुंबई प्रतिनिधी । भारतीय महिला संघाने तिसऱ्या टी-२० सामन्यात विडिंज संघाचा पराभव केला आहे. नाणेफेक जिंकून विंडीजच्या संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. विडिंजचे ६० धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करत भारताने ७ गडी राखून विजय मिळवला. तसेच मालिका ३-० ने खिशात घातली.

नाणेफेक जिंकून विंडीजच्या संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत विंडीज संघाचा भारतीय गोलंदाजांनी ५९ धावांत खुर्दा उडवला. त्यांच्या कर्णधाराचा निर्णय अत्यंत चुकीचा ठरला. विंडीजच्या ८ फलंदाजांना दोन अंकी धावसंख्याही गाठता आली नाही. विंडीजकडून छीडन नेशन आणि सीनल हेन्री या दोघींनी सर्वाधिक ११ धावा केल्या. भारताच्या राधा यादव व दिप्ती शर्माने प्रत्येकी २ तर अनुजा पाटील, पूजा वस्रकार, हरमनप्रीत कौर आणि पूनम यादव या चौघींनी १-१ बळी टिपला. ६० धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरूवात खराब झाली होती. सलामीवीर शफाली वर्मा शून्यावर बाद झाली. स्मृती मंधानाही पाठोपाठ ३ धावांवर बाद झाली. हरमनप्रीत कौरही ७ धावांवर माघारी परतली. पण जेमायमा रॉड्रीग्जने नाबाद ४० धावांची खेळी करत भारताला सामना जिंकवून दिली.

Protected Content