इंदोरीकर महाराजांच्या वक्तव्याबाबत आज सत्र न्यायालयात सुनावणी

 

संगमनेर, वृत्तसेवा । निवृत्ती महाराज इंदोरीकरांच्या वादग्रस्त वक्तव्य प्रकरणावर आज संगमनेर सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. मागील सुनावणीच्या वेळी अंनिसनं हस्तक्षेप करण्यासाठी कोर्टात अर्ज केला होता. त्याला इंदोरीकरांच्या वकिलांनी आक्षेप घेतला असून आज न्यायालय हस्तक्षेप याचिका अर्ज स्वीकारणार की फेटाळणार याकडं सर्वांच लक्ष लागलं आहे.

समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांनी पुणे जिल्ह्यातील उरण व नगर तालुक्यातील एका ठिकाणी आपल्या कीर्तनातून सम आणि विषम तिथीचे सूत्र मांडतांना त्यातून अपेक्षित संततीची प्राप्ती होते असे वादग्रस्त विधान केल्याचा आरोप करीत अंधश्रद्धा निर्मुलन समितीने जिल्हा शल्यचिकित्सकांकडे त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार संगमनेरच्या ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.भास्कर भंवर यांनी संगमनेरच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांच्या न्यायालयात इंदोरीकरांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.

‘स्त्रीसंग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात. जर टायमिंग हुकला की क्वॉलिटी खराब. पुलश्य नावाच्या ऋषींनी कैकसी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आला तर आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संग केला तर त्याच्या पोटी हिराण्यक्ष नावाचा राक्षस जन्माला आला. हिरण्यकक्षपूने नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माला आला.’ दरम्यान, अपत्यप्राप्तीसाठी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी वाद टोकाला गेल्यावर पत्रक जाहीर करुन दिलगिरी व्यक्त केली होती.

Protected Content