विद्यापीठाच्या पदवी, पदविका प्रमाणपत्र अर्जासाठी मुदतवाढ

जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या 29 व्या दीक्षांत समारंभात विद्यार्थ्यांना पदवी/पदवीका प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी विलंबशुल्कासह ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत 30 नोव्हेंबर पर्यंत वाढविण्यात आली आहे.

विद्यापीठातर्फे ऑक्टोबर,2019 व त्यापूर्वी घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व अद्यापपावेतो ज्या विद्यार्थ्यांनी पदवी प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज सादर केलेले नसतील त्यांनी दि.30 ऑक्टोबर पर्यंत अर्ज सादर करावेत. असे आवाहन संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ यांनी केले होते, तथापि आता 30 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर 30 नोव्हेंबरपर्यंत विलंब शुल्कासह ऑनलाईन अर्ज भरता येतील.

उत्तीर्ण वर्षापासून पाच वर्षाचे आत पदवीप्रमाणपत्रासाठी रूपये 350/- तर उत्तीर्ण वर्षापासून पाचवर्षापेक्षा जास्तीचा कालावधीसाठी रूपये 1000/- शुल्क भरावयाचे आहेत. माहे एप्रिल-मे, 2020 च्या होणार्‍या परीक्षेत उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पदवी/पदविका प्रमाणपत्र अर्ज भरण्यासाठी परीक्षेच्या निकालानंतर स्वतंत्र तारखा जाहीर करण्यात येतील अशी माहिती संचालक,परीक्षा व मूल्यमापन मंडळ यांनी दिली आहे.

Protected Content