एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑनलाईन कार्यशाळेचे उद्घाटन

जळगाव प्रतिनिधी । एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालय व एआयसीटीइ न्यू दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने ” डिजिटली कंट्रोल्ड पॉवर कनेक्शन फॉर इंडस्ट्रियल अँड रिन्यूएबल अँप्लिकेशन्स ” या विषयावर २६ ते ३१ ऑक्टोबर कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.

सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वंभूमीवर संशोधनाला गती देण्यासाठी एआयसीटीइ न्यू दिल्ली द्वारा तीन कार्यशाळेला संमति देण्यात आली आहे. प्रथम कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. शैलेंद्र जैन , डायरेक्टर ऑफ संत लोंगोवाल इन्स्टिटयूट ऑफ इंजिनीरिंग ॲण्ड टेक्नोलोंजि पंजाब, प्राचार्य प्रा.डॉ.के.एस. वाणी, उपप्राचार्य प्रा.डॉ. संजय शेखावत उपस्थित होते. या कार्यशाळेशेमध्ये देशातील उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा दिल्ली, राजस्थान, गुजरात, गोवा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र अशा विविध राज्यातून ८० प्राध्यापक तसेच संशोधन स्नातक यांनी सहभाग नोंदवला आहे. या कार्यशाळे दरम्यान विविध विषयातील तज्ज्ञ व्यक्तीकडून पॉवर इलेकट्रोनिक्स आणि रिन्यूएबल एनर्जी या क्षेत्रातील सध्यस्थितीतील संशोधन आणि भविष्यातील संशोधनाच्या संधी याबद्दल अमूल्य असे मार्गदर्शन मिळेल.

कार्यशाळेचे यशस्वी आयोजनासाठी इलेकट्रोनिक्स व टेलेकॉम्युनिकेशन विभागप्रमुख डॉ. एस. आर. सुरळकर, इलेकट्रीकल विभागाचे प्रमुख व्ही एस पवार, कार्यक्रमाचे समन्व्यक डॉ. पी जे शाह , डॉ. पी व्ही ठाकरे, डॉ. पी. एच. झोपे, प्रा. अमोल वाणी, प्रा. धनेश पाटील, प्रा. निलेश महाजन , प्रा. सतपाल राजपूत श्री. योगेश पाटील विशेष परिश्रम घेतले.

Protected Content