Home धर्म-समाज विज वितरणातर्फे कर्मचाऱ्यांमध्ये कोरोना जनजागृती व सॅनिटायझर वाटप

विज वितरणातर्फे कर्मचाऱ्यांमध्ये कोरोना जनजागृती व सॅनिटायझर वाटप

0
32

 

खामगाव, प्रतिनिधी । सध्या सर्वत्र कोरोना वायरसचा परिणाम जाणवत आहे. याकरिता खामगाव येथील वीज वितरण विभागीय कार्यालयात कार्यकारी अभियंता बद्रीनाथ जायभाये यांनी कोरोनाबाबत जनजागृती केली. यावेळी त्यांनी दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या.

विज वितरणातर्फे मुख्यतः वसुलीचे काम सुरू असल्यामुळे कर्मचाऱ्यांना घरोघरी जाऊन ग्राहकांकडून थकीत बिलाची रक्कम वसूल करण्याचे अभियान सुरू आहे. याकरिता खामगाव येथील कार्यालयामध्ये कार्यकारी अभियंता बद्रीनाथ जायभाये यांच्या उपस्थितीमध्ये सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी ,वीज वितरणमधील बहुतांश कर्मचारी उपस्थित होते. एकंदरीत आता दक्षताचे पावले सर्व राज्यात सर्वत्र पाहण्यात मिळत आहे. यावरून कोरोनाची धास्ती न घेता दक्ष राहण्याचे चित्र सर्वसामान्यमध्ये दिसून येत आहे


Protected Content

Play sound