यावल, प्रतिनिधी | येथील विठ्ठलवाडी परिसरातील रहीवासी आणि यावल ग्रामीण रुग्णालयातील नांव नोंदणी विभागात लिपीक म्हणून सेवेत कार्यरत असलेले वासुदेव उर्फ बंडु संपत कोळी (वय ५५ वर्ष) यांचे दिनांक २८ जानेवारी मंगळवार रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. वासुदेव कोळी उर्फ बंडुभाऊ म्हणुन ते सर्वांना परिचित होते. उद्या दिनांक २९ रोजी सकाळी १० वाजता त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे .
वासुदेव कोळी यांचे हृदयविकाराने निधन
5 years ago
No Comments