वाणिज्य प्रश्नमंजूषा स्पर्धेत चोपडा महाविद्यालय तृतीय

chopda 1

चोपडा, प्रातिनिधी | चाळीसगाव येथे बी.पी.आर्ट्स व वाणिज्य महाविद्यालयात नुकत्याच झालेल्या विद्यापीठस्तरीय वाणिज्य प्रश्नमंजूषा स्पर्धेत येथील महाविद्यालयाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विभागाच्या विद्यार्थ्यांनी अंतिम फेरीमध्ये तृतीय क्रमांक पटकावला आहे.

 

महाविद्यालयाला ७०० रुपये रोख तसेच ट्रॉफी व प्रमाणपत्र असे बक्षीस मिळाले आहे. सदर स्पर्धेत विभागातील कु.प्रविण रविंद्र शिंपी, उदय सुकदेव राजकुळे, अनिकेत विलास सनेर या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.तसेच संघ व्यवस्थापक म्हणून सहाय्यक प्रा.प्रविण आय. जैन यांनी त्यांना मार्गदर्शन केले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, प्राचार्य डॉ.डी.ए.सुर्यवंशी, उपप्राचार्य तसेच विभागप्रमूख सहा.प्रा.सी.आर.देवरे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Protected Content