वाढीव फी रद्द करा अन्यथा विद्यापीठ बंद पाडू – युवासेनेचा इशारा

जळगाव  – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी  | विद्यापीठाने संशोधनासह उच्च शिक्षणाची फी  १००-३६१ टक्क्यांनी वाढवली आहे. ही वाढ सात दिवसात रद्द न केल्यास विद्यापीठ बंद पाडू असा इशारा  उपजिल्हा युवा अधिकारी पियुष गांधी यांनी  कुलगुरू व्हि. एल. महेश्वरी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

 

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगांव यांनी नुकतेच प्रवेश फी वाढ केल्या संदर्भात परिपत्रक क्र. ३०/२०२२ काढून सर्व महाविद्यालय व विद्यापीठातील विभागांना त्याची अंमलबजावणी या शैक्षणिक वर्ष (२०२२-२३) पसून सुरू करावी असे निर्देष दिले आहेत.  या  परिपत्रकात नमूद केलेल्या पदविका, पदवी, पदव्युत्तर आणि पीएचडी सारख्या सर्व अभ्यासक्रमांचे वाढ केलेले प्रवेश शुल्क आणि वाढ करण्याआधी आकारण्यात आलेले प्रवेश शुल्क याची तुलना केली असता प्रवेश शुल्क वाढ १००-३६१ टक्क्यांपर्यंत वाढ केलेली निदर्शनात येते.

गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून कोरोना काळात आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याने  सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने खान्देश परिसरातील विद्यार्थ्यांवर आणाली आहे. या अवाढव्य प्रवेश शुल्क वाढ करून विद्यापीठ प्रशासनाने शिक्षणाचा उद्देश डावलून पैसा कमवण्याचा विचार प्राधान्याने केलेला दिसतो. विद्यापीठाने संशोधन प्रवेश शुल्क १०६ ते १२६ टक्क्यांनी वाढविले, याचा फटका ज्या विद्यार्थ्यांना कुठलाही उत्पन्नाचा स्त्रोत नाही त्यांनी संशोधन कार्याला कसा प्रवेश घ्यावा, असा यक्ष  प्रश्न उपस्थित झाला आहे. येत्या ७ दिवसाच्या आत जर पदविका, पदवी, पदव्युत्तर आणि पीएच.डी. अभ्यासक्रमाची वाढलेली अवाढव्य प्रवेश फी वाढ रद्द नाही केली तर विद्यापीठ बंद करू असा इशारा आज युवासेनेच्या माध्यमातून देण्यात आला आहे. निवेदनावर उपजिल्हा युवा अधिकारी पियुष गांधी, विशाल वाणी, अमोल मोरे, अंकित कासार अॅड. अभिजित रंधे आदींची स्वाक्षरी आहे.

 

Protected Content