पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील वाकडी येथे गाणे म्हणत विवाहितेचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत पहूर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील वाकडी येथे २८ वर्षीय विवाहिता ही आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. सोमवारी २२ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता विवाहिता आपल्या मुलीला घेऊन सासूकडे जात असताना रस्त्यावर उभा असलेला सागर सुरेश आवटे रा. वाकडी ता.जामनेर जि. जळगाव याने विवाहितेकडे पाहून तुझ्या “जवानीचे संभाळ गाठोडे” असे गाणे म्हणून शिट्ट्या वाजवून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे.
या संदर्भात विवाहितेने पहूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून मंगळवारी २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता संशयित आरोपी सागर सुरेश आवटे रा. वाकडी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल किरण शिंपी करीत आहे.