दारूच्या नशेत तरूणाला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी

जळगाव-लाईव्ह टेंडस न्यू प्रतिनिधी । शहरातील गेंदालाल मिल परिसरात काहीही कारण नसतांना तरूणाला शिवीगाळ करून त्यांच्या मुलाला जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील गेंदालाल मिल परिसरात कुणाल अशोक हटकर (वय-२६) रा. संभाजी राजे चौक, गेंदालाल मिल, जळगाव हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. सोमवार २२ ऑगस्ट रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास कुणाल हटकर हा उभा असतांना शहारूक खान शब्बीर खान उर्फ चायना रा. गेंदालाल मिल, जळगाव हा दारूच्या नशेत येवून काहीही कारण नसतांना तरूणाच्या वडीलांना शिवीगाळ केली. तर कुणाल हटकर याला जीवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी मंगळवारी २३ ऑगस्ट रोजी रात्री जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्याच्या तक्रारीवरून शहारूक खान शब्बीर खान उर्फ चायना रा. गेंदालाल मिल यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content