Home क्राईम कुसुंबा-रायपूर फाट्याजवळ भरधाव बुलेटची तरूणाला धडक

कुसुंबा-रायपूर फाट्याजवळ भरधाव बुलेटची तरूणाला धडक

0
105


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पायी जाणाऱ्या तरूणाला भरधाव वेगाने येणाऱ्या बुलेटने जोरदार धडक दिल्याची घटना समोर आली आहे. या घटनेबाबत मंगळवारी २३ ऑगस्ट रोजी रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आत्माराम तुकाराम चव्हाण (वय-२९) रा. पठार तांडा ता. जामनेर जि.जळगाव हा तरूण २१ ऑगस्ट रोजी रात्री साडे अकरा वाजात कुसुंबा येथून रायपूर फाट्याकडे येत असतांना भरधाव वेगाने येणाऱ्या बुलेटने जोरदार धडक दिली. या धडकेत आत्मारात चव्हाण यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी २३ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता आत्माराम चव्हाण यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात बुलेट चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गफ्फार तडवी करीत आहे.


Protected Content

Play sound