अंजाळे आणि भालशिव पिंप्री शिवारात गावठी हातभट्ट्या उध्वस्त

 

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील अंजाळे आणि भालशिव पिंप्रीच्या शिवारातील तापी नदीपात्रात व परिसरात यावल पोलीसांनी धाड टाकून सुरू असलेल्या गावठी दारूच्या हातभट्टया उद्धवस्थ करण्यातपरिसरातील मोठया प्रमाणावर महीलांनी या कार्यवाहीचे स्वागत केले. पोलीसांनी कार्यवाही केल्याने अवैध धंद्यावाल्यामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

या संदर्भात मिळालेली माहीती अशी की, यावल तालुक्यात विविध गावांमध्ये मोठया प्रमाणावर घातक रसायनाद्वारे तयार केलेली गावटी हातभट्टीची दारू मोठया प्रमाणावर विकली जाते. या दारूच्या व्यसनामुळे शेकडो अल्पवयीन मुले बळी पडल्याने आज अनेक कुटुंब उद्धवस्थ होवुन त्यांच्या जिवनाची राखरांगोळी होत असल्याचे ह्दयविदारक पारिस्थिती निर्माण झाली आहे. यावल पोलीस ठाण्याचे पो.नि. अरूण धनवडे यांनी यांनी आज तालुक्यातील अंजाळे येथे मोर नदीकाठावर व भालशिव पिंप्री या शिवारातील असलेले तापी नदीच्या पात्रात चालत असलेला तीन गावठी हातभट्टी उद्धवस्थ केल्या असुन यात सुमारे ४०० लिटर दारूचे कच्चे रसायने भरलेले ड्रम (टाक्या) जागीच नष्ठ केल्या. घटनास्थाळावरून २० लिटर तयार दारू जप्त करण्यात आली आहे. पोलीस कर्मचारी मुजफ्फर खान, संजय देवरे व आदी पोलीसांनी धाड टाकल्याने घटनास्थळावरून तीन जणांनी पळ काढला. या संदर्भात यावल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

Protected Content