अमळनेर गजानन पाटील | वृक्ष लागवडीसाठी सर्वांनी एकत्र येऊन वृक्ष लागवड करून पर्यावरणाचा समतोल राखूया व निसर्गाच्या सानिध्यात जीवन जगून निरोगी राहूया असे प्रतिपादन वसंतनगर ता.पारोळा येथे वसंतराव ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष सुभाष जाधव यांनी केले.
वृक्ष लागवड उपक्रमाप्रसंगी गजमल जाधव, अभेराम जाधव, संतोष जाधव, आत्माराम जाधव, अशोक जाधव, जवाहर जाधव, भरत जाधव, एकनाथ जाधव, रोहिदास जाधव, मनोज जाधव, चेतन जाधव, विनोद जाधव, कमल जाधव ,करतार जाधव, सुरेश जाधव, विठ्ठल जाधव, मुख्याध्यापक सी. के. पोतदार , प्राथमिक मुख्याध्यापक सोपान पाटील आदींची उपस्थिती होती. सुभाष जाधव पुढे म्हणाले, पर्यावरणाचा समतोल राखला न गेल्यामुळे आपल्या सर्वांना मोठ्या महामारीला सामोरे जावे लागले. यातच ऑक्सिजनची कमतरता पडल्याने प्राण गमवावे लागले. तर राज्यात पावासाने काही ठिकाणी अतिवृष्टी ला सामोरे जावे लागले तर काही ठिकाणी जमिनी ओस पडल्या.यासाठी वृक्ष लागवड मोहीम सर्व स्तरावर राबवली गेल्यास नक्कीच भविष्यात फायदा होईल.शासन रोजगार हमीतून वृक्ष लागवडीसाठी याकरिता मोठ्याप्रमाणात निधी खर्च करीत असून याचाही लाभ घ्यावा असेही त्यांनी यावेळी सांगितले. गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्यने उपस्थित होते.सूत्रसंचालन प्रा.हिरालाल पाटील यांनी केले. प्राथमिक, माध्यमिक,उच्च माध्यमिक आश्रम शाळेचे सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/259863862737808