यावल शहरात पाण्याचा वाल्व नादुरूस्त; प्रहार संघटनांसह ग्रामस्थांनी केला अनोखा निषेध

यावल प्रतिनिधी । शहरातील बाजारपेठ परिसरात पाण्याचा वाल्व नादुरूस्त असल्याने पाणी रस्त्यावर साचत आहे. यावेळी प्रहार संघटना आणि ग्रामस्थांनी कागदाच्या होड्या बनवून नगरपरिषदेचे लक्ष वेधून अनोखा निषेध व्यक्त केला आहे. 

शहरातील बाजारपेठ असलेल्या व वर्दळीच्या ठिकाणी वाल्व नादुरुस्त झाल्याने पाण्याची मोठ्या प्रमाणावर नसाळीसर्व वॉल्व मधुन या ठीकाणी पाण्याची नासाडी होत आहे याचं उत्तर गुरुवारी पहावयास मिळाले. पाण्याची नासाडी झाल्याने ते पाणी तुंबले असता याकडे नगरपालिकेचे लक्ष वेधण्यासाठी शहरातील सुज्ञ नागरीक  व काही समाजसेवकांनी साचलेल्या पाण्यात कागदी होड्या तयार करून पाण्यात सोडले. यामुळे आता तरी नगरपालिकेने तात्काळ याची दखल घेत व्हॉल दुरुस्त करण्याचे काम सुरू केले आहे. शहरातील मेन रोड मुख्य बाजार पेठवॉल नादुरुस्त झाल्याने पाण्याची नासाडी होत होती. या ठीकाणी पाण्याची गळतीमुळे अशुद्ध पाणी नळाव्दारे नागरिकांच्या घरात येत होते. संतप्त झालेल्या झालेल्या नागरिकांनी गुरुवारी या साचलेल्या पाण्यात कागदाचे नाव तयार करून नगरपालिकेचे लक्ष वेधले व निषेध केला या विषयाची संपूर्ण दिवसभर  ही चर्चा चांगलीच रंगली यामध्ये प्रहार संघटनेच्या वतिने मनोज रामदास करकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदनही देण्यात आले. निवेदनावर गणेश वाणी, धनंजय सराफ, महेश वाणी . बाळकृष्ण कस्तुरे ,अनिल वारुडकर ,अरुण बारी, गोपाळ वाणी, नितीन रणधिरे ,संदीप बारी आदी उपस्थित होते.

 

Protected Content