गणेश निकम यांना डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम राष्ट्रीय गौरव पुरस्कार

चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  येथील कवी गणेश निकम यांना आज रविवार, दि.३१ जुलै २०२२ रोजी एकता फाउंडेशन तथा शिव भीम सेना संस्थापक डॉ. संजय रामटेके यांच्या हस्ते डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम राष्ट्रीय गौरव पुरस्कार ऑनलाईन प्रदान करण्यात आला.

यापूर्वी गणेश निकम यांना अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद (पुणे ), मानवसेवा अकादमी अमरावती, खानदेश कन्या व महिला विकास मंडळ जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र शिवसन्मान पुरस्कार २०२१ अमरावती, राज्यस्तरीय आदर्श शिक्षक रत्न पुरस्कार २०२०, ग्लोबल बंजारा फाउंडेशन,विश्वसमता कलामंच लोवले (रत्नागिरी ), राज्यस्तरीय विश्वसमता पुरस्कार २०२०, डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय शिक्षक अकादमी फुले आंबेडकरी विचार शिक्षक संमेलन २०२१, क्रांतिसूर्य महात्मा फुले राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार यांसह अनेकविध पुरस्काराने विविध मान्यवर संस्थानी त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक तसेच वाड़मयीन क्षेत्रातील उल्लेखनीय कामाची दखल घेऊन पुरस्कृत केले आहे. पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन केले जात आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.