वरणगावमध्ये भारत बंदला शंभर टक्के दुकानदारांचा पाठिंबा

 

 

वरणगाव : प्रतिनिधी । केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्याच्या आंदोलनास भारत बंदच्या हाकेला प्रतिसाद देऊन आज वरणगाव शहरात दुकानदारांनी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शंभर टक्के दुकाने बंद ठेऊन स्वयंस्फुर्तीने पाठिंबा दिला.

वरणगाव शहरात आज मंगळवारचा बाजार होता. तरी सुद्धा दुकानदार, व्यापारी, टपरीधारक, लोटगाडीधारक यांनी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला शंभर टक्के प्रतिसाद दिला. महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी शहरात फिरून दुकानदारांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. दुकानदारांनी स्वतः स्वयंस्फुर्तीने आपली दुकाने बंद ठेऊन भारत बंदला प्रतिसाद दिला. महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी शहरात फिरून बस स्टॅन्ड चौकात आल्यावर केंद्र सरकारच्या कृषी कायद्या विरोधात घोषणाबाजी केली.

यावेळी शिवसेनेचे भुसावळ तालुकाप्रमुख समाधान महाजन, जिल्हासंघटक विलास मुळे, शहराध्यक्ष रवी सुतार, प.स.सदस्य सुधाकर सुरवाडे, सुरेश चौधरी, सईद मुल्ला, सुनील भोई, अमर सोनार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी, तालुकाध्यक्ष दिपक मराठे, शहराध्यक्ष संतोष माळी, जिल्हा उपाध्यक्ष वाय.आर.पाटील सर, गजानन वंजारी, अनिल चौधरी, पप्पू जकातदार, माजी नगरसेवक विष्णू खोले, रवींद्र सोनवणे, समाधान चौधरी, इफ्तेखार मिर्जा, गणेश चौधरी, काँग्रेसचे शहराध्यक्ष अश्फाक काझी, मनोज देशमुख सर, उपाध्यक्ष प्रकाश भैसे, मुस्लिम अन्सारी, शैलेश बोदडे, दिलकश अन्सारी यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content